व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort

लोहगड-भाजे या अरुंद आणि नादुरुस्त रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यटक त्रस्त झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
road leading to Lohagad Fort is narrow dangerous Demand for immediate widening and repair

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोहगड-भाजे या अरुंद आणि नादुरुस्त रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यटक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचकडून कऱण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडाचे नामांकन झाले आहे. तसेच, लोहगडला मोठ्या संख्येने शिवप्रेमी व पर्यटक येत असतात.सध्या देशी-विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने या गडाला भेट देत असतात. लोहगड-भाजे हा रस्ता अतिशय अरुंद असून तो धोकादायक बनला आहे. साइड पट्टीवर मोठे खड्डे पडल्यामुळे शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यांना रस्त्यावर ठिकठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागते. बरेच पर्यटक नवीन असल्यामुळे व त्यांना घाटाची माहिती नसते. त्यांचे वाहन मध्येच अडकून पडते. विदेशी पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

लोहगड विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, सचिन निंबाळकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, खजिनदार अनिकेत आंबेकर, सदस्य चेतन जोशी, बसप्पा भंडारी, गणेश उंडे, अमोल गोरे, अजय मयेकर, अमोल मोरे, संदीप भालेकर, ओमकार मेढी, सिद्धू जाधव आदी कार्यकर्ते याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.

लोहगड-भाजे रस्त्याचे शासनाने त्वरित रुंदीकरण करावे. आवश्यक त्या धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे करावेत. धबधब्याच्या ठिकाणी वाहनांचे रस्त्यावर पार्किंग बंद करावे. संपूर्ण घाट क्षेत्रात नो-पार्किंग झोन करावा. काही जण गाडी वाहने रस्त्याकडेला उभी करून हुल्लडबाजी करतात. रस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत ‘वन वे’ केल्यास वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी सुटेल, असे मंचचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News


Previous Post

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन ! पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यभर राबविणार

Next Post

मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.