मावळ तालुक्यातील सुदवडी गावातील साई – सृष्टी नगरातील नागरिकांना पक्क्या रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पक्का रस्त्या नसल्याने चिखलमय रस्ता आणि राडा रोड्यातून नागरिकांना, अबालवृद्धांना विद्यार्थ्यांना मार्ग काढून चालावे लागत आहे. आता थोडा पाऊस ओसरल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गुलाब कराळे आणि सुमित कराळे यांनी स्वखर्चाने इथे मुरुम टाकून रस्ता तात्पुरता सुधरवला आहे. परंतू इथे पक्का अंतर्गत रस्ता होणे नितांत गरजेचे असल्याचे सतीश काळे यांनी दैनिक मावळला सांगितले.
जोरदार पावसामुळे साई सृष्टी नगरात जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले. त्यात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला होता. खराब आणि धोकादायक निसरड्या रस्त्यावरुन स्थानिक नागरिकांना दररोज चालावे लागत. गुलाब कराळे, सुमित कराळे यांनी या रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकून रस्ता बनवला आहे. परंतू इथे पक्का अंतर्गत रस्ता होणे गरजेचे असून, आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून इथे रस्ता बनवला जाणार आहे. त्यासाठी निवेदन देण्यात आले असून पावसाळा संपल्यानंतर काम सुरु होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती सतीश काळे यांनी दिली. ( Roads under Sudavadi Village Maval Taluka are damaged )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन
– वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– मावळ भाजपचा 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा; रविंद्र भेगडे यांची माहिती