महासिर मासा यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ‘एक्स सिटु कंजर्वेशन ऑफ़ एंडेंजर्ड महासिर इन इंद्रायणी रिव्हर पुणे इंडिया’ या विषयावर नागलगांव यांनी त्यांचा शोधप्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता. त्यावर रोहित नागलगांव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे नागलगांव हे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना संशोधनकामी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
फ्रेंडस ऑफ नेचरने राबविलेल्या इंद्रायणीतील महासिर मासा संवर्धन प्रकल्पाचे प्रमुख महासिर मासा तज्ञ डॉ. शशांक ओगले यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम पाहिले होते. त्यामुळे या संशोधन कामात त्यांना डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. शशांक ओगले, डॉ. सुधाकर इंदुलकर आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रोहित नागलगांव यांनी याआधी त्यांच्या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत. ( Rohit Nagalgaon who researched Mahasir Fish Awarded PhD by Mumbai University )
इंडियन सायन्स यूथ काँग्रेस परिषदेमध्ये मौखिक सादरीकरणामधे तृतीय क्रमांक, इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लनरी कॉन्फरन्स ऑन ईमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. फ्रेंडस ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी त्यांच्या संशोधन कार्याचे कौतूक केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा –
– सोमाटणे येथील मुऱ्हे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई । Talegaon Dabhade Crime
– उपवास म्हणजे काय ? तो का आणि कसा करावा ? आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख
– Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे