Dainik Maval News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळ्यात रिपब्लिकन उद्योग परिषदेची बैठक संपन्न झाली. लोणावळ्यातील वलवण व्हिलेज याठिकाणी संपन्न झालेल्या या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. यात प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आठवले यांनी आरपीआय ही महायुतीचा घटक पक्ष म्हणूनच ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. तसेच महायुतीकडे आपण ७ ते ८ जागांची मागणी करणार असल्याचे सांगितले.
मागितलेल्या जागा कमी जास्त होऊ शकतील. सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपावरून वाद विवाद सुरू असला तरीही लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इतर पक्षातून तिकीट मिळणार नसल्याने अनेक जण शरद पवार गटात जात आहेत. हर्षवर्धन पाटील हे त्याचं उदाहरण आहे. पण त्याचा फार फायदा होणार नाही. शिवाय दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र कुणीही जात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्रित आणून सूक्ष्म आणि लघु व्यवसाय, खादी ग्रामोद्योग, स्टार्टअप योजना, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या सारख्या ज्या अनेक योजना आहे त्यांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना व्हावा यासाठी आरपीआयची एक उद्योग विंग स्थापन करून त्यामाध्यमातून किमान १० लाख तरुण तरुणींना उद्योग मिळवून द्यायचा असा निर्णय आरपीआयच्या रिपब्लिकन उद्योग परिषदे घेण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade