Dainik Maval News : काही पुढाऱ्यांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला असला तरी सुनीलअण्णा तू एकटा नाहीस. मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावळातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भाच्यांचंही अफाट प्रेम तुम्ही मिळवले आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तर सुनीलअण्णांचा विक्रमी विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे या गावांचा जनसंवाद दौरा केला. ब्राह्मणवाडी येथे झालेल्या जनसंवाद सभेत चाकणकर बोलत होत्या. त्यावेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, सरपंच वर्षा नवघणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते. रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा दणदणाट, औक्षणासाठी सुवासिनींच्या रांगा, गुलाबी फेटे घातलेल्या माता-भगिनींची प्रचंड गर्दी अशा वातावरणात ठिकठिकाणी आमदार शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, तालुक्यातील केलेली प्रचंड विकासकामे, अफाट जनसंपर्क यामुळे आमदार शेळके यांना माता-भगिनींसह मावळातील मायबाप जनतेचे प्रचंड प्रेम मिळत आहे. एवढे प्रेम फारच थोड्या लोकांच्या नशिबी असते. हे प्रेम कमवावे लागते. धमकावून असे प्रेम कधीच मिळत नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी मावळ तालुक्याला आणण्याचे सर्व श्रेय सुनील शेळके यांचे आहे. त्यांनी तो निधी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचविण्याचे कामही केले. अपार मेहनतीतून त्यांनी जनतेचे हे प्रेम मिळविले असून मावळची मायबाप जनता त्यांना कधीही एकटे पडू देणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही रक्कम दरमहा २,१०० रुपये करण्यात येणार आहे. त्यासाठी महायुती पुन्हा सत्तेत येणे आवश्यक आहे. त्यासाठी माता-भगिनींनी सुनीलअण्णांना भरभरून मतदान करावे, असे आवाहन चाकणकर यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade