पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी पुन्हा एकदा मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व सचिन घोटकुले यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सचिन घोटकुले यांनी फेरनिवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, मावळचे आमदार सुनिल शेळके आदी उपस्थित होते.
तसेच संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे आदी तालुक्यातील नेते देखील यावेळी उपस्थित होते, अशी माहिती पीएमआरडीए सदस्य माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांनी माध्यमांना दिली. ( Sachin Ghotkule Re-Appointed as Pune District President of Nationalist Youth Congress )
सचिन घोटकुले यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, युवा अस्मिता रॅली, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर, दहा हजार वृध्दांना चष्मे वाटप, आरोग्य तपासणी शिबीर आदी अनेक उपक्रम राबवून जिल्ह्यातील युवक संघटना वाढविण्याचे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत घोटकुले यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी काम करण्याची जबाबदारी दिल्याचे दिसते.
सचिन घोटकुले यांच्या फेरनिवडीने मावळ तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडीनंतर घोटकुले यांचा बबनराव भेगडे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, मावळ युवकचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे, मावळ तालुका ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, अशी माहिती पीएमआरडीए सदस्य माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांनी माध्यमांना दिली. ( Sachin Ghotkule Re-Appointed as Pune District President of Nationalist Youth Congress )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन