Dainik Maval News : होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या मार्फत आंदर मावळ विभागातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बाल लैंगिक शोषण आणि सुरक्षित व असुरक्षित स्पर्श या विषयावर विशेष सत्र घेण्यात आले. संस्थेचे समुपदेशक सचिन करंजुले यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपली काळजी घेणे, तसेच सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श याची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे ही संस्था मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये समुदाय विकास प्रकल्प चालत आहे. सध्या संस्थेचे शैक्षणिक विकास प्रकल्प आंदर मावळ विभागातील अनेक शाळांमध्ये सुरू आहे. बाल स्नेही शाळा, बालकांचे अधिकार, बालग्राम संरक्षण, काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बाल लैंगिक शोषण या विषयावर संस्था मागील 16 वर्षांपासून काम करत आहे. ( Safe and Unsafe Touch Lessons for Students in Andar Maval from Hope for Children Foundation )
मुलांना उमलत्या वयात प्रेम, मैत्री, आकर्षण आणि लैंगिक शोषण याची तसेच पोक्सो कायदा विषयाची सखोल माहिती मिळाली. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारले. त्याचेही निरसन करण्यात आले. सेवाधाम आश्रम शाळा, वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव, माध्यमिक विद्यालय इंगळून येथील सधारण 250 विद्यार्थी आणि 20 शिक्षक यावेळी उपस्थित होते. सत्राचे आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापिकांनी संस्थेचे आभार मानले.
अधिक वाचा –
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात