Dainik Maval News : आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर तसेच काही लोक घरामध्येही घटस्थापना करतात. यंदा सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्त गावोगावच्या मंदिरांत देवीच्या देवळात घटस्थापना करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील दुर्गसेवकांनी किल्ले तुंग गडावरील आई तुंगाईच्या देवळातही घटस्थापना केली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र (मावळ तालुका) यांच्या माध्यमातून दरवर्षी शारदीय नवरात्रोउत्सव निमित्त पवन मावळातील दुर्ग तुंग अर्थात कठिणगड वर आई तुंगाई देवी मंदिरात घटस्थापना केली जाते. सोमवारी प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी गडावर जात देवीच्या राऊळात विधीवत घटस्थापना व महाआरती केली. तसेच पुढील नऊ दिवस प्रतिष्ठानकडून गडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवास विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यामध्ये दुर्गामातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. नऊ दिवस देवीची पूजा, उपवास, जप, ध्यान, आरती, गरबा यासह अन्य धार्मिक गोष्टी भक्तिभावाने करण्याची परंपरा जपली जाते. यंदा 25 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया