Dainik Maval News : स्वराज्याचे सरसेनापती श्रीमंत खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव बनेश्वर येथील समाधी स्थळावर दाभाडे घराण्यातील वंशज आणि मान्यवरांच्या पुष्पांजली समर्पित करून अभिवादन करण्यात आले. यासह नगर परिषद कार्यालयात देखील सरसेनापती दाभाडे यांना अभिवादन करण्यात आले.
शुक्रवारी (दि.27) झालेल्या अभिवादन सभेला माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त सर सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान व अन्य संस्थाकडून पुण्यतिथी व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांचे वंशज आणि नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांच्या हस्ते खंडेराव दाभाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वेहेरगाव तलावात बुडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Karla News
– तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत कान्हे शाळेच्या ‘शिवनेरी’ किल्ल्याला द्वितीय मानांकन । Maval News
– तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शोभेची फुलझाडे भेट, रोटरी सिटीचा उपक्रम । Talegaon Dabhade