(तळेगाव दाभाडे) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने समर्थ शलाका शिष्यवृती स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार (दिनांक 16 मार्च) रोजी नूतन इंजिनिअर कॉलेज सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मिळकत कर अधिकारी जयंत मदने हे उपस्थित होते. ( Samarth Shalaka Scholarship Competition Exam Prize Distribution Concluded Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तालुक्यातील संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये पूर्व परीक्षेत 753 विद्यार्थी प्रविष्ट होऊन अंतिम परीक्षेसाठी 155 पात्र झाले होते. त्यातील प्रथम क्रमांकासाठी 5001 रूपये, द्वितीय क्रमांकासाठी 3001 रूपये, तृतीय क्रमांकासाठी 2001 रूपये व तसेच उत्तेजनार्थ रोख 1001 रूपये आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच प्रत्येक शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रक्कम 501 रूपये तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
यावेळी तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, संस्थेचे सचिव व समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, संस्थेचे संचालक सहप्रकल्प प्रमुख सोनबा गोपाळे, संस्थेचे संचालक दामोदर शिंदे, महेशभाई शाह, शंकर नारखेडे यांच्यासह मुख्याध्यापक सुदाम वाळुंज, भाऊसाहेब आगळमे, पांडुरंग पोटे, संजय वंजारे, कैलास पारधी, राम कदमबांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश खांडगे म्हणाले की, मावळ तालुक्यातून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थी घडले पाहिजे. त्यासाठी संस्थेने या परिक्षेच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेचे अभ्यास केंद्र उपलब्ध करून दिले आहे. तसेच तालुक्यातील विविध ठिकाणी अशी मार्गदर्शन केंद्र उभारण्याची गरज आहे.
हेही वाचा – वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन
विद्यार्थी दशेमध्ये एमपीएससी यूपीएससी परीक्षेची भीती घालवत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला सामोरे जावे, तसेच पुढील काळात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी व्हावी, आत्मविश्वास वाढावा यासाठी समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली आहे, असे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी बोलताना सुप्रिया शिंदे म्हणाल्या की, स्पर्धा परिक्षेची खरी ओळख शालेय पातळीवर होत असते आणि विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हावे त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. यावेळी बोलताना मदने म्हणाले की, मावळ तालुक्यातून प्रशासकीय सेवेमधून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तयारीसाठी आवश्यक असणारी अभ्यास केंद्रे कमी जाणवते त्यासाठी संस्थेने विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. एमपीएससी यूपीएससी परीक्षेत शहरी भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव व समर्थ शलाका शिष्यवृती स्पर्धा परीक्षेचे प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी तर आभार समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे सहप्रकल्प प्रमुख सोनबा गोपाळे यांनी मानले.
अधिक वाचा –
– येळसे गावातील तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश
– मावळात खेळ रंगला महिलांचा, वैष्णवी रसाळ ठरल्या सौभाग्यवती 2023 च्या मानकरी, विजेत्यांना मिळाली भरघोस बक्षिसे