Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला येथील जेष्ठ अध्यापक संजय राम हुलावळे, उपाध्यपदी संतोष घरदाळे तर खजिनदारपदी संगिता खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नूतन महाराष्ट्र माद्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष समीर गाडे यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदासाठी हुलावळे, उपाध्यक्षपदासाठी घरदाळे व खजिनदार पदासाठी संगिता खराडे यांचा ऐकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. पतसंस्थेचे कार्यकारी संचालक (सीईओ) म्हणुन भाऊसाहेब आगळमे काम पाहत आहेत.
यावेळी माजी अध्यक्ष समीर गाडे, संचालक सोमनाथ साळुंके, विनोद भोसले अलका आडकर,भारत काळे,संजय कसाबी,रूपेश शिंदे दत्तात्रय ठाकर,रोहित ढोरे,गणेश साबळे, वंदना मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हुलावळे म्हणाले की, पतसंस्थेचा सभासद हीत डोळ्यासमोर ठेवुन त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील व संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील निवडीनंतर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे व सचिव संतोष खांडगे, एकविरा विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळ यांनी अभिनंदन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
