भारत देशाची वाटचाल आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असताना शहरी व ग्रामीण भागातील तफावत दूर करण्यासाठी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज आहे. तसेच शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याकडे पूर्ण लक्ष देऊन शिक्षणाची आवड निर्माण केली पाहिजे. आधुनिक युगात मातृ भाषेबरोबर इंग्रजी भाषेची गरज असल्याचे जागतिकीकरणाच्या वातावरणात दिसून येत आहे. यावेळी तुटपुंज्या फी वर शाळा चालणार्या संस्थेचे आणि शिक्षकांचे कौतूक केले पाहिजे, असे रामदास काकडे यांनी म्हटले. ( Sankalp English School Pavananagar Annual Award Distribution Ceremony Concluded In Presence Of Ramdas Kakde )
संकल्प इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे बोलत असताना काकडे यांनी, पालकांनी नियमित फि भरावी असे आव्हानही केले. कोविड काळात शाळा चालू ठेवण्याचे आव्हान असताना शिक्षणासाठी जी मेहनत घेतली ती मावळवासियांसाठी अभिमास्पद आहे. भविष्यात शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी लागणार्या मदतीचे आश्वासन काकडे यांनी यावेळी दिले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण भागात संकल्प इंग्लिश स्कूल सारखी इंग्रजी माध्यमाची शाळा असणे आणि तेथील विद्यार्थी आणि शिक्षक अस्खलित इंग्रजीचा वापर करतात, हे पाहून रामदासजी काकडे भाराऊन गेले. मार्गदर्शन करताना रामदास काकडे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यामातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा. विद्यार्थ्यांच्या मनात लपलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळन देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.
कार्यक्रमाला संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय कालेकर, संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, कार्याध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर, संचालक डॉ. संजय चौधरी,आरिफ तांबोळी, संचालिका विद्या गांधी, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल भांगडिया, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन कांचन भालेराव, वसंतकुमार गुजर,रो. गुरूदीपसिंग भोगाळ,रोटरीचे अजित कोठारी, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलगे, जेष्ठ नेते महादेव कालेकर, संत तुकाराम सह. साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, सरपंच खंडू कालेकर, गणेश गायकवाड, उपसरपंच अशा कालेकर, पोलिस पाटील सीमा यादव, ग्रामपंचायत सदस्या छाया कालेकर, सदस्य उत्तम चव्हाण आदी मान्यवर आणि पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ( Sankalp English School Pavananagar Annual Award Distribution Ceremony Concluded In Presence Of Ramdas Kakde )
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. गोंधळ, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, लावणी, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा, किलबिल गीते, चॉकलेट चा बंगला, सामी सामी, अशी वेगवेगळी नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांबरोबर पालकांचीही मने जिंकली. उपमुख्याध्यापीका नीता कालेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
हेही वाचा – संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे बालिका दिन अत्यंत उत्साहात साजरा । Savitribai Phule Jayanti
यावेळी वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणुन क्रीडा आणि विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी संस्थेचे संचालक डॉ. संजय चौधरी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री गोकर्णबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्टुडंट ऑफ द इयरचा पुरस्कार (रुपये 25000 आणि सन्मानचिन्ह) इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु. समीक्षा सुनील काळे हिला देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, प्रियांका येवले, वैष्णवी काळे, आशा बोरकर, सुजाता वाघेरे, निकिता कालेकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू कदम आणि मीनाक्षी शिवणेकर यांनी केले आभार मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी मानले.
अधिक वाचा –
– ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल’ – आमदार सुनिल शेळके
– पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कुसगाव आणि कदमवाडी येथील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये