व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध हॉटेलमध्ये न्यूड पार्टी, पोलिसांच्या छाप्यात अश्लील नृत्य करणारे 53 जण ताब्यात

लोणावळा येथील व्हिस्परिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण-तरुणींकडून नग्न अश्‍लील नृत्य केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 4, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Nude-Dance-Party-Lonavla

File Image


देशातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा जवळील वलवण येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये मुला-मुलींच्या न्यूड डान्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात मध्यरात्री मोठ्या आवाजात गाणी लावून अश्लील नृत्य करणाऱ्या 53 जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 44 पुरुष आणि 9 महिला आहेत. लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांंच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे लोणावळा परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Lonavala Police Arrested Fifty Three Girls And Boys For Doing Nude Dance Party In Hotel )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील व्हिस्परिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण-तरुणींकडून नग्न अश्‍लील नृत्य केले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 1 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना 53 जण कपडे न घालता नाचताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून साउंड सिस्टीम जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींना पोलिस कोठडी…

पुणे, मुंबईसह लोणावळा परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे लोक भेटायला आणि राहायला येतात. या न्यूड डान्स पार्टीत स्थानिक लोकांव्यतिरिक्त काही बाहेरील लोकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळले. पोलिसांनी छापा टाकताच अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप अजिनाथ बोराडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी भादंविच्या कलम 294, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने अशा कारवायांमध्ये सहभागी असलेले हॉटेल मालकही हैराण झाले आहेत.

अधिक वाचा –

– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी
– ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल’ – आमदार सुनिल शेळके


dainik maval jahirat

Previous Post

‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल’ – आमदार सुनिल शेळके

Next Post

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; प्रमुख पाहुणे रामदास काकडेंकडून विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे कौतुक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sankalp-English-School

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; प्रमुख पाहुणे रामदास काकडेंकडून विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.