व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी

कामशेत पोलीस स्टेशनच्या पोलिस हवालदार आणि आणि पोलिस मित्राला मारहाण करुन जखमी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात कामशेत पोलीस पथक आणि ग्रामसुरक्षा दलाला यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
crime-arrested

File Photo


कामशेत पोलीस स्टेशनच्या पोलिस हवालदार आणि आणि पोलिस मित्राला मारहाण करुन जखमी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात कामशेत पोलीस पथक आणि ग्रामसुरक्षा दलाला यश आले आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी मौजे ताजे गावच्या हददीतील एच.पी. पेट्रोल पंपासमोर घडलेल्या सदर घटनेतील तीनही आरोपींना पोलिसांनी अगदी सिनेस्टाईलने आणि अथक प्रयत्नांनी जेरबंद केले आहे. ( Kamshet Police Succeeded In Arresting Accused Who Escaped After Beating Police Mitra )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 जानेवारी रोजी मौजे ताजे हद्दीतील एका पेट्रोलपंपासमोर काहीजण लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दहशत निर्माण करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिस तेव्हा घटनास्थळी गेले असता तिथे काहीजण हातात लाठ्या-काठ्या घेऊन असलेले दिसून आले, त्यानुसार पोलिस त्यांच्याजवळ गेले असता त्यातील काही पोलिसांना हवे असलेले गंभीर गुन्ह्यांतील आरोपी असल्याचे दिसून आले. आरोपी दत्ता वाघमारे, मुस्ताफा शेख, मंगेश वाघमारे या तिघांना पोलिसांनी ओळखले आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी झालेल्या झटापटीत आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करुन मारहाण केली आणि जखमी केले. कामशेत पोलिसचे पोलिस हवालदार राऊळ आणि पोलिस मित्र आसिफ शेख हे यात जखमी झाले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर घटनेची गंभीर दखल घेत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी विविध पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय जगताप आणि गुन्ह्याचे तपास अधिकारी आकाश पवार यांच्या सुचनेनुसार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला. यातील मुस्ताफा शाकीर शेख (वय 19 वर्षे, रा फातीमा नगर भिसेवाडी, कर्जत, जि रायगड) याला पोलिसांनी कामशेत घाटात डोंगरांत मोठ्या शिताफीने पकडला. त्यानंतर आरोपी दत्ता वाघमारे, मंगेश वाघमारे यांचा पोलिसांनी पाठलाग करुन पैकी मंगेश उर्फ मंग्या सखाराम वाघमारे (वय 23 वर्षे रा कोश्याने, कर्जत जि रायगड) याला पोलिस मित्र, ग्रामसुरक्षा दल आदींच्या मदतीने कोंडीवडे, मोरमारेवाडी असा झाडाझुडपातुन, शेतातुन, डोंगरातुन 15 ते 20 किलोमीटरचा परिश्रम करुन पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कामशेत पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी, स्टाफ तसेच हददीतील नागरीकांचे मदतीने अत्यंत सराईत अशा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगीरी अंकित गोयल (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण), मितेश घटटे (अप्पर पोलीस अधिक्षक) सत्यसाई कार्तिक (सहा. पोलीस अधिक्षक, लोणावळा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप (पोलीस निरीक्षक, कामशेत) आकाश पवार (सहा. पोलीस निरीक्षक) सहाफौज अब्दुल शेख, पोहवा गणेश तावरे, पोहवा संदीप शिंदे, पोहवा रविंद्र राय, पोहवा दिक्षीत, पोना हनुमंत वाळुंज, पोना प्रविण विरणक, पोना सुहास सातपुते, पोना सचिन निंबाळकर, पोना नितीन कळसाईत, पोना सुनिल गवारी, पोना अनिल हिप्परकर, पोकॉ आशिष झगडे, पोकॉ रविंद्र राउळ, पोकॉ डोईफोडे, मपोकॉ बैरागदार, सर्व नेमणुक कामशेत पोलीस स्टेशन, होमागर्ड लोखंडे, नवनाथ गायखे, ट्राफीक वार्डन प्रशांत कटके, नितेश चव्हाण तसेच सांगिसे, कांब्रे, कोंडीवडे, मोरमारवाडी, साई गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलाचे जवान यांनी केली आहे.

अधिक वाचा –

– कामशेत पोलिसांची जबरदस्त कामगिरी! गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद, आरोपीकडून पिस्तूलासह जिवंत काडतुसे जप्त
– विधान परिषद निवडणूक : कोकणात झटका तरीही राज्यात मविआचाच डंका, भाजप पराभवाचं चिंतन करणार, पाहा सर्व निकाल


Previous Post

‘मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प’, केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार श्रीरंग बारणेंची विस्तृत प्रतिक्रिया, वाचा…

Next Post

कसबा विधानसभा पोटनिवडणूक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार, उमेदवार ठरला?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chandrakant-Patil

कसबा विधानसभा पोटनिवडणूक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार, उमेदवार ठरला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.