व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

परंपरा मोडली… अखेर साखर कारखान्याच्या निवडणूकीची घोषणा, 5 एप्रिलला मतदान आणि मतमोजणी । Sant Tukaram Sugar Factory Election

कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (दि.२७) जाहीर झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 28, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (दि.२७) जाहीर झाली. अर्ज माघारीच्या दोन दिवसांनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी ही यादी जाहीर केली.

या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी २२६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी २६ दुबार, तर ५ नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात १९५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. त्यातून अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे.

  • २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

उमेदवारांची अंतिम यादी :
ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) : ३ जागा
विदुरा नवले (ताथवडे)
चेतन भुजबळ (पुनावळे)
दत्तात्रय जाधव (नेरे, पो. जांबे)
बाळू भिंताडे (कासारसाई)

ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट) – ३ जागा
धैर्यशील ढमाले (बेळावडे)
यशवंत गायकवाड (नाणेगाव, पो. कुळे)
दत्तात्रय उभे (कोळावडे)

ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव) : ३ जागा
ज्ञानेश्वर दाभाडे (माळवाडी, पो. इंदोरी)
बापूसाहेब भेगडे (तळेगाव दाभाडे)
संदीप काशिद (इंदोरी)

ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर) : 3 जागा
छबुराव कडू (पाचाणे, पो. चांदखेड)
भरत लिम्हण (सांगवडे, पो. साळुंब्रे)
उमेश बोडके (गहुंजे, पो. देहूरोड)

ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-गिरूर-हवेली) : ४ जागा
अनिल लोखंडे (मरकळ)
धोंडिबा भोंडवे (शिंदे वस्ती, रावेत)
विलास कोतोरे (चिंबळी)
अतुल काळजे (काळजेवाडी, चऱ्होली बु.)

महिला राखीव – २ जागा
ज्योती अरगडे (काळुस)
शोभा वाघोले (दारुंब्रे)

अनुसूचित जाती-जमाती : १ जागा
लक्ष्मण भालेराव (काले पो. पवनानगर)

इतर मागासवर्ग : १ जागा
राजेंद्र कुदळे (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे)

विमुक्त जाती/भटक्या जमाती – १ जागा
शिवाजी कोळेकर (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड)

मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम
हिंजवडी-ताथवडे मतदारसंघासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. कारखाना कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली-शिरूर या तालुक्यांतील ५७ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. एकूण २२,२५८ जण मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

‘या’ उमेदवारामुळे लागली निवडणूक
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ मार्च होती. त्याच दिवशी सायंकाळी ‘निवडणूक बिनविरोध’ झाल्याचे बॅनरही झळकू लागले. मात्र, उमेदवारांची अंतिम यादी २५ व २६ मार्चला प्रसिद्ध केली नाही. हिंजवडी-ताथवडे गटामधून बाळू भिंताडे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दोन दिवस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केळे. पण, यश आले नाही. अखेर निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान 


Previous Post

वडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज वार्षिक उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सुधीर ढोरे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी । Vadgaon Maval

Next Post

टाकवे खुर्द येथे पीएमपी बसला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PMPML bus hit by bike at Takwe Khurd bike rider injured

टाकवे खुर्द येथे पीएमपी बसला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.