व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News

श्री देहू संस्थान, प्रशासन आणि पालखी सोहळा समिती यांच्यात सातत्याने नियोजनात्मक बैठका पार पडत असून पालखी सोहळा निर्विघ्न पार पडवा यासाठी सुक्ष्म नियोजन केले जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या पायी वारीतील श्री संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. श्री देहू संस्थान, प्रशासन आणि पालखी सोहळा समिती यांच्यात सातत्याने नियोजनात्मक बैठका पार पडत असून पालखी सोहळा निर्विघ्न पार पडवा यासाठी सुक्ष्म नियोजन केले जात आहे.

novel ads

नुकतीच पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंदिराच्या दर्शन सभागृहात आढावा बैठक पार पडली. उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली या पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस डॉ.माने, तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज गोसावी तसेच सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

  • वारकरी चालत जाणाऱ्या देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, नियमबाह्य आणि अनावश्यक असलेले गतिरोधक काढावेत, असा मुद्दा देहू देवस्थान संस्थानने उपस्थित केला. यावर पालखीपूर्वी लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईट पट्टे भरून घेणे अशी कामे केले जातील असे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे.

देहू ते देहूफाटा (येलवाडी) दरम्यान असल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून त्वरित डागडुजी करून घ्यावी, अशी सूचना माने यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी मार्गावर पहिली अभंग आरती अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करणे, वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा ,शुद्ध पाणीपुरवठा या संदर्भातील प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आले.

अखंड विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे, आरोग्याच्या दृष्टीने संसर्गजन्य परिस्थिती पाहता त्याच्या उपाययोजना, औषधोपचार करणे ,स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणे,सोहळा मार्गस्थ होताना पालखी रथ व वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी व शासकीय विभागाने समन्वय साधून रस्त्या वरील खड्डे त्वरित बुजवणे, दुतर्फा मुरूम टाकणे, अचानक उदभवणाऱ्या आपत्ती काळात पूर्वनियोजन करणे, सुरक्षितच्या दृष्टीने वाहतूकीचे ,मुक्काम स्थळी विद्युत व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे,पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त लावणे ,सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,नियंत्रण कक्ष तयार करून सर्व विभागातील अधिकारी,पदाधिकारी कर्मचारी यांचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला उपजिल्हाधिकारी डॉ यशवंत माने यांनी यावेळी दिल्या.

24K KAR SPA ads

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक पर्यावरण दिन । राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश
– महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!


dainik maval ads

tata car ads

Previous Post

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात ! स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू । Lonavala News

Next Post

वडगाव मावळ महावितरण उपविभागाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tree plantation on occasion of World Environment Day by Vadgaon Maval Mahavitaran Sub Division

वडगाव मावळ महावितरण उपविभागाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News

August 1, 2025
pm-kisan-samman-nidhi-yojana

आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार

August 1, 2025
Witchcraft outside house of a NCP office bearer in Talegaon Dabhade city

तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद

August 1, 2025
Urgent measures should be taken to resolve traffic congestion at Chakan Nashik Phata meeting at Ministry

चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न

August 1, 2025
Ms-Swaminathan

भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार

August 1, 2025
Minister Chandrakant Patil

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत; …अन्यथा पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया रोखणार

August 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.