Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार शुक्रवारी, ७ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकूण २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु महत्वाची घडामोड म्हणजे आमदार सुनील शेळके यांनी देखील साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे ही निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे दिसते.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत व्यक्ती उत्पादक सभासद, अनुसूचित जाती/जमाती, महिला राखीव प्रतिनिधी, इतर मागासवगीय प्रतिनिधी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी यांच्या एकूण २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
व्यक्ती उत्पादक सभासद गटात एकूण पाच गट नंबर आहेत. यात गट नंबर १ हिंजवडी ताथवडे (संचालक संख्या ३), गट नंबर २ पौड-पिरंगुट (संचालक संख्या ३), गट नंबर ३ तळेगाव-वडगाव (संचालक संख्या ३) गट नंबर ४ सोमाटणे-पवनानगर (संचालक संख्या ३), गट नंबर ५ खेड-हवेली-शिरूर (संचालक संख्या ४) यांचा समावेश आहे. त्यातील सोमाटणे-पवनानगर गटातील तीन जागांसाठी सर्वाधिक ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल खेड-शिरूर-हवेली गटातील ४ जागांसाठी ३७ उमेदवारी अर्ज, तळेगाव-वडगाव गटातील तीन जागांसाठी तीन जागांसाठी २९ उमेदवारी अर्ज, हिंजवडी-ताथवडे गटासाठी २३ व पौड-पिरंगुट गटासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल झालेत.
आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी – उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर समोर आलेल्या उमेदवारी अर्जांच्या यादीनुसार, गट नंबर ३ तळेगाव-वडगाव गटातून स्वतः आमदार सुनील शेळके यांनी देखील त्यांची उमेदवारी दाखल केली आहे. तसेच याच गटातून त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचाही उमेदवारी अर्ज दाखल असल्याचे समोर आले असून आमदार शेळके यांच्या एन्ट्रीनंतर साखर कारखान्याची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत असल्याचे दिसते. ( Sant Tukaram Sugar Factory Election MLA Sunil Shelke files nomination )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन