Dainik Maval News : पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी संतोष मारूती भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक प्रक्रिया पुण्यात शिवाजीनगर येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात पार पडली.
फेडरेशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) बी. एल. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सकाळी अकरा वाजता निवडणुकीची सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संतोष भेगडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
फेडरेशनचे नवीन पदाधिकारी व संचालक पुढीलप्रमाणे
अध्यक्षा – रेश्मा अनिल भोसले
उपाध्यक्ष – शामराव किसन हुलावळे
सचिव – संतोष मारूती भेगडे
फेडरेशनचे सर्व संचालक मंडळ
संतोष गोपाळराव पाटील, रमेश लक्ष्मण भुजबळ, नंदकुमार गंगाधर गायकवाड, प्रवीण रामचंद्र ढमाळ, दिलीप तुकाराम वेडेपाटील, नितीन गुलाबराव गोरे, जयवर्धन अनिल भोसले, आदित्यसिंह अविनाश घोलप, मंदाकिनी शहाजी चव्हाण, विनायक गुलाबराव तांबे, यतीन कुमार गोविंद हुले, नानासाहेब दाजीराम मोकाशी, माणिकराव महादेव झेंडे, अमृता स्वप्निल रानवडे, वंदना प्रशांत काळभोर, दीपक उत्तम जवंजाळ, तानाजी शंकर लवटे, नितीन शरदचंद्र पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी), सुदाम एन तांदळे (सहाय्यक निबंधक)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका