Dainik Maval News : पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालकपदी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य आधारस्तंभ तसेच तळेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, डोळसनाथ पतसंस्थेचे मा. अध्यक्ष राहुल पारगे, राजेंद्र सरोदे, सचिव कैलास भेगडे व हिंदवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग या सत्कार समारंभासाठी उपस्थित होते.
- संतोष भेगडे यांचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व सहकार , कला -क्रीडा अशा विविध क्षेत्रात मोठा वावर आहे. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पटसनसंस्थेचे अध्यक्ष म्हणून 10 वर्षे काम केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA ) सदस्य, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सदस्य असून या पदांना त्यांनी न्याय दिला आहे.
संतोष भेगडे यांनी राजकीय व सहकार क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. संतोष भेगडे फाउंडेशनच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक