Dainik Maval News : इंग्रजांचा भारतातील पहिला पराभव हा ऐतिहासिक वडगाव मावळ येथे झाला. आपला इतिहास हा पराजयाचा नाही, तर पराक्रमाचा व हुतात्म्याचा आहे. तो सर्वांनी घराघरात पोचवावा, असे आवाहन शिवशंभू विचार मंचाचे संपर्क प्रमुख सच्चिदानंद तथा माऊली आहेर यांनी केले.
महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्यावतीने श्रीमंत सरदार महादजी शिंदे विजय दिन सोहळा गुरुवारी (दि.१६) विविध कार्यक्रमांनी व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शिवराय व हिंदुत्व या विषयावर आहेर यांचे व्याख्यान झाले.
- आहेर यांनी सांगितले की, शिव छत्रपतींच्या काळापूर्वी परकीयांच्या आक्रमणात येथील समाजावर, नेतृत्वावर व स्त्रियांवर अत्याचार झाले. देवदेवतांची मोठ्या प्रमाणावर विटंबना झाली. या सर्व अत्याचाराला उत्तर देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आपला इतिहास हा पराक्रमाचा असून तो सर्वांनी घराघरांत पोचवावा असे आवाहन त्यांनी केले.
गुरुवारी विजय दिनाच्या सोहळ्यानिमित्त श्रीमंत महादजी शिंदे उद्यानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर व माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या हस्ते तिकोना, लोहगड, विसापूर, राजमाची, राजगड या किल्ल्यावरील जल कुंभामधून आणलेल्या पाण्याने श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला.
सायंकाळी माऊली आहेर यांचे व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी राज्य वैद्य मापन समितीचे सदस्य भाऊसाहेब लांडगे होते. अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू गोपाळ देवांग, चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील, हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक राजाभाऊ बेंद्रे, मोडी लिपी अभ्यासक अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उद्योजक दत्तात्रेय कुडे, अजित देशपांडे, महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्थेचे संस्थापक अँड. रवींद्र यादव आदी उपस्थित होते.
महिला क्रिकेटपटू वैष्णवी सतीश म्हाळसकर हिला महादजी शिंदे क्रीडा पुरस्कार, तर सातारा येथील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे हरिश्वंद्र गेनबा बागडे यांना महादजी शिंदे दुर्गवीर पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अँड. रवींद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. सचिन ढोरे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश जाधव यांनी आभार मानले. सचिन ढोरे, राजेश जाधव, नितीन म्हाळसकर, गणेश जाधव, हनुमंत जांभूळकर, नितीन चव्हाण, स्वप्नील आंबेकर, श्रीनिवास कुलकर्णी, अभिजित भिडे, सुनील नखाते, मंगेश खैरे, स्वप्नील बोराडे आदींनी संयोजन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा
– आता कोणत्याही कार्यक्रमावेळी ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक, अन्यथा थेट तुरुंगवास । Pune News
– “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते” – आमदार सुनिल शेळके