व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते” – आमदार सुनिल शेळके

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखा आयोजित मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्यामध्ये उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 16, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke inaugurated Maval Taluka Literary and Artist Gathering

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते. समाजाच्या निकोप वाढीसाठी, स्वास्थ्यासाठी कलांची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कलाकारांचे अत्यंत महत्त्व आहे. आपण फक्त रंगभूमीवरील कलावंतांना पहातो व त्यांनाच मान देतो. तथापि पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकाराचे महत्त्व सुद्धा तेवढेच असून त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. साहित्यिक, कलाकार यांचे त्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या सर्वांना पुरेसे मानधन राज्य शासनाने द्यावे यासाठी मी प्रयत्न करेन,” असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

Novel NIBR Ads

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखा आयोजित मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्यामध्ये उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. आमदार शेळके पुढे म्हणाले, तळेगावात आधुनिक नाट्यगृह असावे ही दीर्घकालीन मागणी प्रलंबित आहे. या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे खंबीर पाठपुरावा करून जे जे करणे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न मी निश्चित करेन.

यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, तळेगावातील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम होत असतात. तसाच विचार केला तर तळेगाव ही पुणे जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानीच म्हणावी लागेल. मावळातून सुमारे २०० साहित्यिक व कलाकार या मेळाव्यास उपस्थित होते. प्रा. अशोक जाधव, डॉ. मिलिंद निकम यांनी सूत्रसंचलन केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी नाट्यपरिषदेचे भूषण गायकवाड, नयना डोळस, संजय वाडेकर, स्वानंद आगाशे, तानाजी मराठे, संकेत खळदे, नितीन शहा, मंजूश्री बारणे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी व्यासपीठावर मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद मावळ अध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबा पाटील, कलावंत मानधन समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, नाट्यपरिषद कार्याध्यक्ष गणेश काकडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, रंगकर्मी विश्वास देशपांडे, राजेश बारणे, अतुल पवार, संजय वाडेकर उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

जागेच्या वादातून दोघांना मारहाण, सोमाटणे फाटा येथील घटना । Talegaon News

Next Post

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.