क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय मुलांच्या कुस्ती स्पर्धेचे सातारा येथे 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले या गटात खोपोलीचा पैलवान सोहेल शेखने आपल्या गटातील तिन्ही मॅच 10 -0 अशा फरकाने जिंकून मानाचे गोल्डन मेडल पटकावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे, भाऊसाहेब कुंभार संकुलाचे प्रशिक्षक राजाराम कुंभार, क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे, प्रशिक्षक विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओंकार निंबळे, प्रा धनश्री कोंडुस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ( Satara Wrestling Tournament Wrestler Sohail Sheikh of Bhausaheb Kumbhar Kusti Complex From Khopoli Became Golden Boy )
सोहेलच्या या यशामुळे केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाह किशोर पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिशा राणे यांनी कौतुक केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा
– आरपीआयचे शशिकांत बेल्हेकर यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी, थेट राज्यस्तरीय पदावर नियुक्ती