महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेतील अत्यंत मानाची आणि महत्त्वाची अशी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२२-२३ ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी, समर्थ मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाली. या भव्य आयोजनात १४ व १७ वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या आठ विभागतील महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे दिमाखदार प्रदर्शन केले. ( Wrestling Competition At Khopoli Raigad district state level school wrestling competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलम्पियन मारुती आडकर, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, टाटा स्टील कंपनीचे ,कपिल मोदी,शशी भूषण, भावेश रावल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, खोपोली नगर परिषद आणि खालापूर नगर पंचायत तसेच रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून कुस्तीगीरांचे कौतुक केले.
राज क्रीडा मार्गदर्शक कुस्ती संदीप वांजळे सर,तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर ,अधिकारी सचिन निकम,मनिषा मानकर, कुस्तीमहर्षी भाऊ कुंभार कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे, दिलीप देशमुख,गुरुनाथ साठेलकर भरत शिंदे, दिनेश मरागजे इत्यादींनी अत्यंत शिस्तबद्धरित्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
हेही वाचा – ठाकरे धनुष्यबाणाची लढाई का हरले? वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशातून शिंदेंच्या विजयाची प्रमुख 5 कारणे
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, समर्थ मंगल कार्यालयाचे जनार्दन जाधव, काशी होम्सचे यशवंत साबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष महाडिक, हरिओम इलेक्ट्रॉनिक्स खालापूरचे महेश राठी, नंदकिशोर ओसवाल, उचाप्पा वरचाली, राजेश अभाणी, कांचन जाधव, रवी पाटील, शिल्पा मोदी, अमोल कदम, ईश्वर शिंपी यांनी विशेष सहकार्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध विभागातल्या कुस्तीगीरांनी रायगड जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या अभूतपूर्व स्पर्धेत आपले कौशल्य दर्शवले. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंचांनी यावेळी तांत्रिक बाजू सांभाळली. सर्व कुस्तीगिरांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले गेले तर विशेष कामगिरी केलेल्यांना पारितोषिकासह प्रमाणित केले गेले.
अधिक वाचा –
– शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! तळेगावसह किल्ले शिवनेरी मार्गावरील ‘या’ टोलनाक्यांवर टोलमाफी
– मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी विजय सुराणा, उपाध्यक्षपदी सचिन ठाकर, वाचा संपूर्ण यादी