पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा पुणे लीडरशिप अवॉर्ड 2022 अंतर्गत सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हिंजेवडी येथे वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस अवॉर्ड्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी पुरस्कार स्विकारला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोंसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. ( SB Patil Public School Best Educational Institution got Pune Leadership Award )
अधिक वाचा –
संमतीशिवाय पत्नीचा गर्भपात, नवऱ्यासह डॉक्टरवर गुन्हा, ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ! आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा, जाणून घ्या