Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर निवडणूक आयोगाची नजर आहे. ठराविक मुदतीत दैनंदिन खर्च उमेदवारांना निवडणूक विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून प्रशासकीय अधिकारी प्रेम प्रकाश मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांच्या खर्चाची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
- मावळ मतदारसंघात शनिवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पहिली खर्च तपासणी, बुधवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुसरी खर्च तपासणी आणि सोमवार, दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांची तिसरी खर्च तपासणी होणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 नुसार उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर करावा. याची सर्व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. तपासणी दिनांका दिवशी उमेदवार अथवा त्यांचा अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनीच उपस्थित राहावे. तपासणी दिनांका व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिवशी नोंदवही तपासली जाणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाक्यावर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी सुरु । Maval News
– त्यांच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजपा पक्ष संपत चाललाय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke
– मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade