लोणावळा शहर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा शहरातील गवळीवाडा येथे एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षीय शाळकरी मुलावर तीन मुलांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकऱणी तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ( School student Was Fatally Attacked By Three Minors In Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारी (दिनांक 24 मार्च) रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान गवळीवाडा परिसरात ही घटना घडली. मुळ कामशेत येथील 16 वर्षीय शाळकरी मुलगा रस्त्यावरुन जात असताना तीन मुलांनी त्याला पकडले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि डोक्यात कठीण वस्तू मारली. यातून मुलगा कसाबसा बचवला. त्याने स्वतः लोणावळा शहर पोलिसांत या घटनेची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
डोंगरगाव भागातील दोन आणि आगवाली चाळ भागातील एक अशी ही तीन अल्पवयीन आरोपी मुले असून त्यांच्यावर भादवी कलम 307 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशाने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा – वेहेरगाव, कार्ला, मळवली सह ‘या’ गावांत मद्य विक्रीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाचा सविस्तर
महत्वाचे म्हणजे यापूर्वी देखील लोणावळा शहर परिसरात शाळकरी मुलांची अनेकदा भांडणे झाली आहे. व्हीपीएस विद्यालयातील एका भांडणाची ध्वनीचित्रफित तर समाजमाध्यमात व्हायरल झाली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील कुरवंडे रस्त्यावर शाळकरी मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याचीही घटना घडली होती. एकंदरीत अल्पवयीन मुलांमध्ये होणारे वाद आणि त्यातून घडणारे गुन्हे हे सध्या चिंतेचा विषय ठरत आहेत.
अधिक वाचा –
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक
– ‘दैनिक मावळ’च्या बातमीचा दणका! कामशेतमधल्या महावितरणच्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन, नागरिकांच्या लढ्याला यश