मावळ तालुक्यातील जांभूळ येथील “परिक्रमा” या आधारभूत सामाजिक सेवा कार्य न्यास सामाजिक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. दोन वर्षांपूर्वी “परिक्रमा” या सामाजिक सेवा कार्याचा जांभूळ येथे शुभारंभ झाला होता आणि आता हे कार्य निरंतर चालू आहे. या सेवाकार्यात अनेकांचा सक्रीय सहभाग तसेच योगदान असते. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी, वृद्धांना इत्यादींना मूलभूत सेवा दिली जाते. ( Second Anniversary Of Parikrama Sanstha NGO At Jambhul Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संस्थेच्या संस्थापिका डॉ. पद्मजा घोरपडे ह्या अतिशय उत्कृष्टरित्या जबाबदारीने ही संस्था चालवत आहे. डॉ. शुभांगी चौगुले या गेली दीड वर्षापासून मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करत आहेत. वर्धापन दिनानिमित्त परिक्रमा संस्था अजून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी आनंद, ज्ञान, मनोरंजन दिग्दर्शन करणारी पुस्तके प्रकाशित करून विनाशुल्क मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी परिक्रमातर्फे राबविण्यात येणार आहे. डॉ. पद्मजा घोरपडे यांचे विद्यार्थी सुदेश पगार यांनी लिहिलेल्या “वाटचाल विचारांची” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व जेष्ठ हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
ज्ञानदीप सामाजिक सेवा केंद्र मुंबई शाखेचे विश्वस्त विजय कासुर्डे परिक्रमा संस्थेच्या संस्थापिका पद्मजा घोरपडे, ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर शालिग्राम भंडारी सर, शुक्ला सर, सुरेखा गाडेकर, संतोषजी नलावडे, महेंद्र ढोरे, यशवंत शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी 30 वर्षांनी भेटलेल्या शिक्षक विद्यार्थी मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून सर्वांनी एकमेकांचा आदर युक्त सन्मान राखत सत्कार केला. मयूर ढोरे यांनी, निस्वार्थी काम करणाऱ्या परिक्रमा या सेवाभावी संस्थेला येणाऱ्या कालावधीत मोरया प्रतिष्ठानच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात शांततेत मतदान! मतदानाची टक्केवारी 79.80 टक्के, एकूण 11,632 मतदारांनी बजावला हक्क
– गाडी रिव्हर्स घेताना काळजी घ्या, हा अपघात चालकांसह पालकांच्याही डोळ्यात अंजन घालणारा