व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिनांक 5 ते 8 जानेवारीपर्यंत लोहगड, घेरेवाडी परिसरात कलम 144 लागू; संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

कायदा सुव्यवस्थेसाठी संभाव्य संघर्ष टाळण्याकरिता, लोहगड व घेरेवाडी येथे दिनांक 5 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लोहगड आणि घेरेवाडी परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Section 144

File Image


दिनांक 6 जानेवारी 2023 ते दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरूस साजरा करण्यासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहत असतो. मात्र, कायदा सुव्यवस्थेसाठी संभाव्य संघर्ष टाळण्याकरिता, लोहगड व घेरेवाडी येथे दिनांक 5 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लोहगड आणि घेरेवाडी परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. ( Section 144 Applicable In Lohgad Gherewadi Area From 5th To 8th January Maval Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हटलंय आदेशात?

पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या प्राप्त झालेल्या अर्जानुसार दिनांक 6 जानेवारी रोजी मौजे लोहगड (ता मावळ, जि पुणे) येथे लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरूस साजरा करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता आहे. तसेच लोहगडावरील 6 जानेवारीचा उरूस साजरा होवू नये यासाठी त्यास प्रखर विरोध दर्शवण्यासाठी मावळ तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत यांचे बजरंग दल आणि इतर संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याबाबत लेखी समर्थन पत्र तहसीलदार मावळ यांना मिळाले आहे.

सदर निवेदनात आणि समक्ष चर्चेत त्यांनी लोहगडावरील दर्गा आणि मजार यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेने मा न्यायालयाचे आदेशानुसार प्रतापगडावरील अनाधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले आहे, त्या प्रमाणे लोहगडावरील अनाधिकृत बांधकाम काढावे, हि बांधकामे अधिकृत करण्यासाठी उरूसाचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोहगडावर उरूस होवू दिला जाणार नाही. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा अनाधिकृत उरूस होवू देणार नाही या प्रसंगी मोठे जनआंदोलन / मोर्चा उभारू असेही सांगितले आहे.

त्यामुळे लोहगडावरील दर्ग्याचा उरूस जवळ आलेला असल्याने उरूसाला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच जातीय तणाव होण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाही. भारतीय पुरातन विभाग पुणे यांनी देखील लोहगडावर दर्ग्याचे उरूसास परवानगी नाकारली असून त्या दरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. लोहगडावरील दर्ग्याचे उरूसाचे दरम्यान हिंदू मुस्लिम समाजाचे लोक मोठया प्रमाणात उरूसाचे दरम्यान लोहगडाचे परिसरामध्ये येणेची शक्यता असल्याने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक 5 जानेवारी ते दिनांर 8 जानेवारी रोजी दरम्यान काळात लोहगड आणि घेरेवाडी या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याची गरज लक्षात घेता,

संदेश शिर्के (उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ- मुळशी, उपविभाग पुणे) यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये दिनांक 6 जानेवारी 2023 रोजीच्या लोहगड किल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गाचा उरूसाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोहगड व घेरेवाडी परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक 5 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून दिनांक 8 जानेवारी 2023 च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आल्या आहेत.

1) कोणीतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक व इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहीती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहील.
2) लोहगड व घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डींग लावण्यास प्रतिबंध राहील.
3) सदर परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी जमा होवू नये.
4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा / भाषण करू नये.
5) सदर परिसरामध्ये मोर्चा / आंदोलन करणेत येवू नये.
6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधी साठी पशु पक्षांचा बळी दिला जावू नये.
7) सदर परिसरामधील ऐतिहासीक व सार्वजनिक वस्तुंचे नुकसान करणेत येवू नये.

वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि.सं. कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायदयान्वये शिक्षेस पात्र राहील, असे आदेश पत्र संदेश शिर्के यांच्याकडून 4 जानेवारी रोजी काढण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू
– रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन


Previous Post

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Next Post

व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड-घेरेवारी भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Section-144-Applicable-In-Lohgad-Gherewadi-Area

व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड-घेरेवारी भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.