कायदा सुव्यवस्थेसाठी संभाव्य संघर्ष टाळण्याकरिता, लोहगड व घेरेवाडी येथे दिनांक 5 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. दिनांक 6 जानेवारी 2023 ते दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरूस साजरा करण्यासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहत असतो. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. ( Section 144 Applicable In Lohgad Gherewadi Area Maval Pune Know In Details )
मात्र, कलम 144 लागू झाल्याने या भागातील नागरिकांवर काय परिणाम होणार, पाहणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, सेक्शन 144 मुळे कोणकोणत्या गोष्टींवर परिणाम होणार…
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संदेश शिर्के (उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ- मुळशी, उपविभाग पुणे) यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये लोहगड व घेरेवाडी परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक 5 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून दिनांक 8 जानेवारी 2023 च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केला आहे;
1) कोणीतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक व इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहीती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहील.
2) लोहगड व घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डींग लावण्यास प्रतिबंध राहील.
3) सदर परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी जमा होवू नये.
4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा / भाषण करू नये.
5) सदर परिसरामध्ये मोर्चा / आंदोलन करणेत येवू नये.
6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधी साठी पशु पक्षांचा बळी दिला जावू नये.
7) सदर परिसरामधील ऐतिहासीक व सार्वजनिक वस्तुंचे नुकसान करणेत येवू नये.
वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि.सं. कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायदयान्वये शिक्षेस पात्र राहील, असे आदेश पत्र संदेश शिर्के यांच्याकडून 4 जानेवारी रोजी काढण्यात आले आहे.
हेही वाचा –
– धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू
– रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन