Dainik Maval News : कृषी विभाग, मावळ तालुका आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रावी कार्यक्रमाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत कृषी दिनानिमित मौजे उर्से गावात भात, सोयाबीन बीजप्रक्रिया व कृषी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमास कृषीकन्या अमृता चांडोले, एकता ढवळे, श्रुती कोपनर, जान्हवी कुपेकर, अनोघा मेश्राम, असदा मुल्ला, उपकृषी अधिकारी नवीनचंद्र बोराडे, उपकृषी अधिकारी विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला भोसले, सरपंच भारती गावडे, प्रगतशील शेतकरी जालिंदर धामणकर, सुभाष धामणकर, भारत ठाकूर, पोलीस पाटील गुलाब आंबेकर , बाळासाहेब कारके, चेअरमन मधुकर सावंत व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रीय बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. थायरम, ट्रायकोडर्मा, गोमूत्र, तसेच चारसूत्री, एस. आर. टी ,अभिनव पद्धत लागवड या बाबत मार्गदर्शन केले. प्रमिला भोसले यांनी कृषी विभागच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील आणि मार्गदर्शक व्ही. बी. घोलप तसेच महाविद्यालयातील मार्गदर्शक प्राध्यापक आर. बी. शिद व वैशाली दरंदले, उर्से ग्रामपंचायतीचे सरपंच,पदाधिकारी आणि शेतकरी तसेच ग्रामस्थ या उपक्रमासाठी उपस्थित होते. हा उपक्रम “कृषिदिन” निमित्त राबवण्यात आला असून, यामधून शेतकऱ्यांमध्ये सुधारित शेती पद्धतीबाबत जनजागृती झाली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक