व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, December 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Shivraj Patil Passes Away । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा अद्वितीय राजकीय प्रवास त्यांनी केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 12, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Senior Congress leader and ex-Home Minister Shivraj Patil passes away at 90

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा अद्वितीय राजकीय प्रवास त्यांनी केला. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र असलेले चाकूरकर एक सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न राजकारणी म्हणून परिचित होते. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील प्रभावी नेता म्हणून उदयास आले.

स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला होता.

२०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात.

गेल्या काही वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. निष्कलंक जीवन आणि राजकारणातील त्यांची अभ्यासू व स्वच्छ प्रतिमा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांचे निधन हे काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठे नुकसान आहे. सर्वच स्तरातून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात


dainik maval jahirat

Previous Post

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे ; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke Minister Chandrashekhar Bawankule

मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mangrul illegal mining case Statewide agitation if suspension of revenue officers is not withdrawn

मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन ; संघटनेचा इशारा

December 17, 2025
Rooftop pub bar

वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

December 17, 2025
grand Chhakdi bullock cart competition organized by Ashatai Waikar at Karla Phata Maval

भिर्रर्रर्र… कार्ला फाटा येथे आशाताई वायकर यांच्या माध्यमातून भव्य छकडी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन ; विजेत्यांवर होणार बक्षीसाची खैरात

December 17, 2025
band called off keep off band image

उर्से निर्भया प्रकरण : चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास फाशी देण्याची मागणी ; गावकऱ्यांचा कडकडीत बंद

December 16, 2025
smart meters

राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय ; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ

December 16, 2025
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

स्मशानभूमीसाठी जागा नसलेल्या गावात स्मशानभूमी बांधण्यासाठी सरकारची विशेष मोहीम

December 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.