व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पैलवान चंद्रकांत सातकर अनंतात विलीन ! अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी

राष्ट्रीय कुस्तीगीर चंद्रकांत आप्पासाहेब सातकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) कान्हे (ता. मावळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Senior Congress leader wrestler Chandrakant Satkar passes away Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय कुस्तीगीर चंद्रकांत आप्पासाहेब सातकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) कान्हे (ता. मावळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पै. सातकर यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देत मान्यरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पै. चंद्रकांत सातकर (वय ८४ वर्षे) यांचे सोमवारी पुण्यात वयाच्या ८४ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. मंगळवारी त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी त्यांचा मुलगा अजित सातकर यांनी पार्थिवाला अग्निडाग दिला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जेष्ठ नेते माऊली दाभाडे, शंकरराव शेळके, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, रामदास काकडे, बाळासाहेब नेवाळे, पै. मारुती आडकर, पै. अमोल बुचुडे, विजय जाधव, संग्राम मोहोळ, नरहरी चोरगे, के.पी.पाटील, बाबुराव वायकर, संभाजी राक्षे, बाळासाहेब ढोरे, यशवंत मोहोळ, राजू खांडभोर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अनेकांनी पै. चंद्रकांत सातकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सातकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. प्रामाणिक, निर्मळ व सज्जन असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांना ओळखत होते. त्यांच्यावर पुस्तक तयार करण्याची सूचना त्यांनी केली. सतीश पाटील म्हणाले, सातकर यांनी अगदी निष्ठेने राजकारण केले. कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला व नातीही जपण्याचे काम केले. हिरामण सातकर यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. गुलाब वाघोले व अतुल सातकर यांनी सूत्रसंचालन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर


Previous Post

मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

Next Post

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त वडगाव नगरपंचायतीकडून पालखी मिरवणुकीचे आयोजन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat organizes Palkhi Procession on occasion of 750th birth anniversary of Sant Dnyaneshwar Maharaj

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त वडगाव नगरपंचायतीकडून पालखी मिरवणुकीचे आयोजन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.