Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय अभिनेत्रीच्या सोन्याच्या दागिन्यांसह अन्य वस्तू चोरीला गेल्याची आणि तिचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. या प्रकरणी जयपूर (राजस्थान) येथील रवी सागरमल शर्मा याच्या विरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते १४ मार्च २०२५ रोजी सकाळी दरम्यान, मावळ तालुक्यातील तुंगार्ली येथील ‘हॅश टॅग ट्रॅव्हलर’ हॉटेलच्या रूम क्रमांक २०३ मध्ये आरोपी रवी शर्मा याने अभिनेत्रीच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या. त्यात ३५,००० रुपये किमतीची सोन्याची चैन, २१,००० रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १०,००० रुपये किमतीचा मोबाईल, २,६०० रुपये रोख रक्कम आणि ५०० रुपये किमतीचे एअरबड असा एकूण ६९,१०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
तसेच, आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने रोमँटिक सीनची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. लोणावळा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग