व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई

शासकीय कामासाठी लाच मागितल्याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 19, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
bribe

File Photo : bribe


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश गुट्टे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी (दि. 18) ही कारवाई करण्यात आली. शासकीय कामासाठी लाच मागितल्याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी एका नागरिकाकडून ५,००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याप्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • तक्रारदाराच्या मित्राला त्याच्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र तयार करायचे होते. परंतु, मित्राचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणाला खिळले असल्याने ते रजिस्टर ऑफिसमध्ये प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे जाऊन डॉ. उन्मेष गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने १७ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर, १८ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे डॉ. गुट्टे यांना पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

  • सदर प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे मागितल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याशी संपर्क साधावा व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना तत्काळ संबंधित विभागाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग


dainik maval jahirat

Previous Post

गुटखा विक्री प्रकरणी तळेगाव येथे एका दुकानदाराला अटक । Talegaon Crime

Next Post

धक्कादायक : लोणावळा येथे नवोदित अभिनेत्रीसोबत गंभीर प्रकार, मौल्यवान वस्तूंची चोरी आणि विनयभंग… । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

धक्कादायक : लोणावळा येथे नवोदित अभिनेत्रीसोबत गंभीर प्रकार, मौल्यवान वस्तूंची चोरी आणि विनयभंग... । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.