Dainik Maval News : गुटखा विक्री प्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली. दुकानदार त्याच्या कारमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना शनिवारी सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई करण्यात आली. निहार गोपाल विश्वास (वय ५३, तळेगाव दाभाडे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील सगर यांनी रविवारी (दि. १६) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या डायल ११२ या यंत्रणेवर कडोलकर कॉलनी क्रमांक एक, तळेगाव दाभाडे येथून कॉल आला होता. कॉल वरील व्यक्तीने सांगितले की, लायन्स विवेकानंद हॉल समोर गुटखा विक्रीसाठी एक व्यक्ती आला आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
फोनवरील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एक कार (एमएच १४/इवाय ३६६८) आढळून आली. कारची पाहणी केली असता कारमध्ये ३० हजार ६३६ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, कार जप्त केली असून निहार याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग