Dainik Maval News : सार्वजनिक शिवजयंती उत्सव पवनमावळ यांच्या वतीने पारंपरिक वाद्य कलेचा सन्मान करण्यासाठी पवनानगर येथे रविवारी (दि.१६) भव्य ढोल-लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे खेळ सादर करण्यात आले.
- स्पर्धेत नवचैतन्य तरुण मंडळ, दापोडी हे ढोल लेझीम पथक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. पवनमावळ येथील सावंत वाडी मित्र मंडळ व रासाई झांज पथक, वडगाव रासाई या दोन संघांना सारख्या वेळेत खेळ सादर केल्यामुळे दोन्ही संघाना द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. चतुर्थ क्रमांक शिवशक्ती तरुण मंडळ ब्राह्मणेली हे मंडळ, पाचव्या क्रमांकाचा काळभैरवनाथ युवा मित्र मंडळ ओव्हळे हे ढोल लेझीम पथक मानकरी ठरले.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक संतोष कोकणे, गोधाम इको व्हिलेजचे अध्यक्ष नितीन घोटकुले, ॲड भरत ठाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर, आंबेगाव शिंदगावचे माजी सरपंच अशोक राजिवडे, माजी उपसरपंच दिलीप राक्षे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, संदीप पाठारे, माजी सरपंच जयवंत घारे, संतोष भिकोले, माजी सरपंच नितिन लायगुडे यांसह पवन मावळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन गणेश सावंत, बबलू कालेकर, सुनिल ढोरे, निलेश कालेकर, विनोद कालेकर, सजन बोहरा, संदीप काळे, सुरज ठाकर, निलेश ठाकर यांनी केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग