आज (दि. 8 मार्च) महाशिवरात्र असल्याने सर्वत्र श्री भगवान महादेवाची पुजा केली जाते. तसेच महादेवाला प्रिय असलेल्या नागराजाचीही पुजा केली जाते. परंतू महादेवांच्या गळ्यात असणारा हा नाग जेव्हा प्रत्यक्षात आपल्या घरात दिसतो तेव्हा मात्र भल्या भल्या भक्तांची भंबेरी उडते. असाच प्रकार मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात आज घडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
शुक्रवारी (दिनांक 8 मार्च) रोजी पहाटे साधारण पावणे चारच्या सुमारास J/२, प्रतिक नगर, तळेगाव स्टेशन येथील तळमजला येथे राहणारे रहिवासी कविराज पाटोळे (निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्या घरात हा प्रकार घडला. साधारण साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास नागाच्या फुत्कारण्याचा आवाज घरातील महिलेला आला. त्या आवाजाने जाग आल्यामुळे घरातील व्यक्तींना नाग हा समोरील देव्हाऱ्याजवळ टेबलावरती फणा काढून बसल्याचे दिसून आले. घरातील व्यक्तींनी नागाची माहिती शेजारी राहणारे पत्रकार राजेश बारणे यांना दिली. ( serpent friend gave life to cobra snake in talegaon dabhade on day of Mahashivratri )
पहाटेच्या सुमारास घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी सर्पमित्र भास्कर माळी यांना फोन केल्यावर अगदी दहाच मिनिटात ते दाखल झाले व सुरक्षित रित्या नागाला रेस्क्यू केले. सुरुवातीला भास्कर माळी यांचा फोन लागत नसल्यामुळे निलेश गराडे यांच्याशी संपर्क केला असता ते येण्यासाठी निघाले होते मात्र दरम्यानच्या काळात भास्कर माळी यांच्याशी संपर्क झाला आणि विना विलंब येऊन त्यांनी नागाला रेस्क्यू केले. सदैव वन्यजीव आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक निलेश गराडे आणि सभासद भास्कर माळी मामा यांचे घरातील सर्व उपस्थित नागरिकांनी मनापासून आभार मानले.
अधिक वाचा –
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar
– पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro