मावळ तालुक्यातील वडगाव येथील असणाऱ्या नागरिक सुविधा केंद्रातील “सर्व्हर डाऊन”च्या असुविधेमुळे मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांचे महत्वपूर्ण दाखल्यांची कामे रखडलेली आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी वर्गाची आर्थिक दुर्बल घटक, वय व अधिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयेर या सारखे विविध प्रकारचे दाखले सर्व्हर डाऊन या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आता जुन महिना चालू आहे, या महिन्यामध्ये केवळ मावळ नव्हे तर संपूर्ण राज्यात कॉलेज प्रवेशाची गडबड चालू असते. प्रामुख्याने वकिली,फार्मसी, एमपीएससी या सारख्या अनेक प्रवेश परीक्षेसाठी वरील नमूद दाखले गरजेचे असतात, ते जर निर्धारित वेळेत मिळाले नाही तर संबंधित विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक नुकासानाला सामोरे जावे लागते.
मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी वर्गाला खूप लांबचा प्रवास करावा लागतो. तरी या विषयात त्वरित लक्ष घालून संबंधित अधिकारी यांना हा तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सूचना द्याव्या, जेणे करून मावळ तालुक्यातील गोर-गरीब विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे निवेदन पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स चे मा अध्यक्ष संस्कार तानाजीराव चव्हाण यांनी दिले. ( Server down at Nagari Suvidha Kendra Delay in getting certificates from Maval Tehsil Office )
प्रसंगी विकास घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या बाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असून हा तांत्रिक बिघाड सुधारित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना खाऊ आणि धान्य, किराणा वाटप
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी गणेश शेडगे यांची नियुक्ती