मावळ तालुक्यात भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. मावस भावाने अल्पवयीन बहिणीचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर सदर पीडित तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा हा गंभीर प्रकार उघडकीस आला. ( Sexual Abuse Of Minor Girl By Maternal Brother Shocking Incident In Maval Taluka Of Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील शिरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सदर पीडितेने शिरगाव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी 18 वर्षीय मावस भावावर आयपीसी 376, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडितेची आई कामावर जात असल्याने ती घरी एकटी राहते, याचाच गैरफायदा घेत नराधम तरुणाने पीडितेचे लैंगिक शोषण केले. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
– पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप