Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची गंभीर अन् संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
एकोणवीस वर्षीय आरोपीने बारा वर्षीय पीडित बालिकेच्या घरी जावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. रविवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित निर्भयाच्या बाजूने महिला पोलीस उपनिरिक्षक यांनी स्वतःहून फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, आरोपीवर कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 65 (2), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे. कामशेत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

