Dainik Maval News : देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर आंबेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आंबेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी, मित्रपरिवाराने आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच सोनाली गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सरपंच वंदना आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शंकर आंबेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका ज्योती जळकुटे यांनी आंबेकर यांची बिनविरोध निवड घोषित केली.
यावेळी सरपंच वंदना आंबेकर, सदस्य विकास दळवी, जयश्री गाडे, आशा आंबेकर, उर्मिला आंबेकर, सोनाली गायकवाड पोलीस पाटील राहुल कान्हु आंबेकर, दिनेश केदारी ग्रामस्थ बाळासाहेब आंबेकर, गणेश केदारी, रविंद्र घिसरे, संजय आंबेकर, सुनील आंबेकर, भानुदास शिंदे, राजेश साठे, मंगेश आंबेकर, नवनाथ कडु, बाळासाहेब केदारी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना उपसरपंच शंकर आंबेकर म्हणाले, ‘ग्रामस्थांनी आधी बिनविरोध सदस्यपदी निवड केली होती. त्यामुळे गावातील विविध विकासाकामांत हातभार लावला. आता विश्वास ठेऊन उपसरपंचपद देऊन अधिक काम करण्याची संधी दिली आहे. माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावून विकासात्मक कामांना प्राधान्य देणार आहे.’
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार
