शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर प्रमुखपदी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शंकर भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंगरगाव येथील पक्षाच्या नव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, अनिकेत घुले, माजी शहरप्रमुख दत्तात्रेय भेगडे आदी उपस्थित होते. ( Shankar Bhegde Appointed Talegaon Dabhade City Chief Of Shiv Sena UBT Party )
अधिक वाचा –
– मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी देहूरोड शहर शाखा कार्यालयाचे उद्घाटन
– पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये, जलदगती न्यायालयांना देखील मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय