शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol Murder Case) गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय 31, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (दि. 6) सायंकाळी अटक केली. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याची साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी मिळून हत्या केली होती. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी पथके बनवून प्रमुख आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यात ऑडिओक्लिप तपासणी नंतर गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी ह्या प्रकरणाचा तपास करत असताना 18 हजार 827 ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यातील 10 हजार 500 ऑडिओ क्लिपमध्ये 6 ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या. साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकर याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आलीये. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे यावेळी उपस्थित होते. ( Sharad Mohol Murder Case Update from Pune Crime Branch )
दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि गणेश निवृत्ती मारणे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पितृशोक! Vasantrao Khandge Passed Away
– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार डिझेल बसगाड्यांचे रुपांतर ‘एलएनजी’ इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये होणार