राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दिनांक 10 जून) वर्धापन दिन आहे. याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येत असल्याचे शरद पवार यांनी घोषित केले. ( Sharad Pawar announces Praful Patel Supriya Sule working presidents of NCP )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Sharad Pawar announces Praful Patel, Supriya Sule working presidents of NCP
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2023
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपले पुस्तक ‘लोक माझे सांगाती’ याच्या प्रकाशनावेळी, आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडणार असल्याची घोषणा केली होती, परंतू कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. मात्र, तेव्हापासूनच पवारांनंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती आणि ती कायम होत होती.
त्यामुळे शरद पवार यांनी आज (शनिवार, दिनांक 10 जून) रोजी जेव्हा ही घोषणा केली, तेव्हा पवारांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली असल्याची चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही नावांची घोषणा शरद पवारांनी दिल्लीत केली, तेव्हा अजित पवार दिल्लीतील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर सुप्रिया सुळे मात्र महाराष्ट्रात होत्या.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा
– मोदी@9 अभियान : तळेगावात भाजपाचे संयुक्त मोर्चा संमेलन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन