राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फुट पडल्याने पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. अशात राज्यातील कार्यकर्ते देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन गटात विभागल्याचे दिसत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. स्वतः आमदार सुनिल शेळके हे अजित पवार यांच्या सोबत असल्याने मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यात शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व दिसून येत नव्हते. मात्र आता शरद पवार गटाकडून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संघटन बांधणी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल वसंतराव वहिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या हस्ते आणि युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षपदी विशाल वहिले आणि तालुका उपाध्यक्षपदी आदिनाथ मालपोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. ( Sharad Pawar Group Vishal Wahile appointed as Maval Taluka NCP Youth Congress President )
‘येणाऱ्या काळात पक्षाचा जास्तीत जास्त प्रचार करत, युवा संघटन करून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेसाठी कार्य करणार. मावळ तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणारा असून, ज्येष्ठ नेते मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम करणार आहे.’ – विशाल वहिले
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ बापु शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, उद्योजक राजेश बाफना, मावळ तालुका अल्पसंख्याक सेल चे मा. अध्यक्ष अफताब सय्यद, युवा नेते सोमनाथ धोंगडे, विजय शिंदे ,अमोल जांभुळकर, सौरभ सावले, अशिष वहिले, पंकज भामरे, अभिजीत ढोरे, लौकिक सासवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनोद टकले, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती; ‘योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
– खासदार बारणेंनी घेतला लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा