Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी आज, गुरुवारी (दि. ३ जुलै) तळेगाव दाभाडे येथे भेगडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतले. मावळचे माजी आमदार, मावळभूषण कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (दि. 30 जुन) रोजी दुःखद निधन झाले. कृष्णराव भेगडे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले. आयुष्यभर त्यांनी शरद पवारांची साथ केली. त्यामुळे कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी भेगडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह तळेगाव दाभाडे येथील स्व. कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी आले. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, उद्योजक रामदास काकडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे, दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते. स्व. कृष्णराव भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून शरद पवार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला.
पवारांनी स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करीत सर्वांची विचारपूस केली, जुन्या मित्राबाबत (स्व. कृष्णराव भेगडे) अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भेगडे कुटुंबीयांनी शरद पवार आणि कृष्णराव भेगडे यांच्या सोबतचे काही जुणे संग्रहीत फोटो दाखवले, यामुळे शरद पवारांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. भेगडे कुटुंबीयांशी चर्चा, संवाद केल्यानंतर पवार पुढील प्रवासाकडे रवाना झाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ