Dainik Maval News : लोणावळा शहराच्या शाश्वत विकासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीतील दोन सदस्यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक नासीर शेख यांनी समितीच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली.
नासीर शेख यांच्या मते, तज्ञ समितीतील सदस्यांची नियुक्ती ही थेट न्यायालयामार्फत होणे आवश्यक आहे. मात्र, ॲड. तन्वी मेहता आणि गंगाराम मावकर यांची नियुक्ती नियमबाह्य आहे. विशेष म्हणजे, ॲड. मेहता या याच जनहित याचिकेत वादी संघटनेच्या (लोणावळा खंडाळा सिटिझन फोरम) वतीने काम करत होत्या, त्यामुळे त्यांची समितीतील निवड हितसंबंधाच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर शेख यांनी या दोघांची नियुक्ती रद्द करावी, तसेच समितीने त्यानंतर घेतलेले निर्णय व कामकाज स्थगित करावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच, पुढील बैठकीत आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि हा विषय अजेंडावर घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. निवेदनाची प्रत लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. आता न्यायालय आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News