व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या ‘शिरगाव सरपंच हत्या’ प्रकरणी मोठी अपडेट! ‘त्या’ तीनही आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

संपूर्ण मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या शिरगाव सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 14, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Shrigaon-Sarpanch-Murder-Case

Photo Courtesy : File Image


संपूर्ण मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या शिरगाव सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या तीनही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांची याच वर्षी एप्रिल महिन्यात (दिनांक 1 एप्रिल) शिरगावच्या साईबाबा मंदिरासमोरील चौकात धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली होती. ( Shirgaon Sarpanch Praveen Gopale Murder Case Update Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हत्येनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासात, महेश पोपट भेगडे (वय 41, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे ता. मावळ), अशोक लक्ष्मण कांबळे (वय 53, रा. कांब्रे नामा ता. मावळ), मनेश देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ ता. मावळ) यांना अटक केली होती. या तिघांचीही आता पुराव्याअभावी खुनात सहभाग नसल्याचे सांगत कोर्टाने निर्दोष मुक्तता (दिनांक 21 जून 2023) केली.

तसेच सदर हत्येप्रकरणात, 1) अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. डॅफोडील सोसायटी सोमाटणे फाटा ता. मावळ), 2) विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25), 3) संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय 31) आणि 4) ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22), तिघे रा. शिरगाव ता. मावळ ) हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, निखिल दिलीप बालवडकर (रा. बालेवाडी पुणे), अमर प्रकाश ओझरकर (रा. माण मुळशी पुणे) व सागर राहुल ओव्हाळ (रा. बालेवाडी जि. पुणे मूळ केम ता. करमाळा जि. पुणे) हे आरोपी अद्याप फरार आहेत.

शिरगाव-परंदवडी पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा राजकीय वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. ही घटना शनिवारी (दिनांक 1 एप्रिल 2023) रोजी रात्री 9:30 च्या सुमारास साई बाबा मंदिराच्याप्रवेशद्वारा समोरच घडली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासात महेश भेगडे, अशोक कांबळे, मनेश ओव्हाळ यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवाना केले होते. परंतू, सदर हत्येच्या गुन्ह्याच्या तपासात महेश भेगडे, मनेश ओव्हाळ आणि लक्ष्मण कांबळे यांचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने आता तिघांचीही निर्दोष मुक्तता केलीये.

अधिक वाचा –
– राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती
– ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन ‘अपर तहसीलदार’

Next Post

देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू! बंद घरात आढळला मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
actor-ravindra-mahajani

देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू! बंद घरात आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.