स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवारी (19 फेब्रुवारी) 393 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर येत असतात. अशा सर्व शिवभक्तांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफी करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून मोठ्या जल्लोषात शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलंय. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! खांडगे ऑटोमोबाईल – हिरो मोटोकॉर्प यांच्यावतीने चार दिव्यांग कमांडो बांधवांना विशेष दुचाकी भेट
– वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?