केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अत्यंत मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (17 फेब्रुवारी) रोजी मातोश्री येथे तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ( Uddhav Thackeray press conference after ECI Declare shiv sena name and bow arrow symbol go to Eknath Shinde group )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलेत उद्धव ठाकरे?
“काय बोलायचे हा देशातला मोठा प्रश्न. निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित. सहा महिने न्यायालयात लढाई सुरु तो पर्यंत निवडणुक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. निवडणुक आयोग बाबत सांगेल जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती.”
“शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही.”
“आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणुक आयोग गडबड करणार. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने. निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का?”
“बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणुक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा.”
“निवडणुक आयुक्तांच्या विरोधात प्रशांत भू़षण यांनी केस दाखल केलीय. पंतप्रधानांनी दखल घेतली असती तर लोकशाही विरोधात कृत्य झाले नसते. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा. आपण लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का? इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते आणीबाणी लावली म्हणून. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे.”
“पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. ज्यांनी गद्दारांना नेता बनवले ते माझ्यासोबतच. निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणुक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आम्ही त्यांना भारी पडले. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात. आज तुमच्या माध्यमातून तातडीने मी शिवसैनिक आणि जनतेसमोर आलो.”
असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
अधिक वाचा –
– शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! तळेगावसह किल्ले शिवनेरी मार्गावरील ‘या’ टोलनाक्यांवर टोलमाफी
– मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, उद्धव ठाकरे गटाला झटका